Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 8 October 2026, 17:00

उरुळी कांचन, ता. 8: डाळिंब (ता. दौंड) येथून ‘उरुळी कांचनला जाऊन येतो’, असे सांगून घराबाहेर पडलेल्या 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह सहा दिवसांनी डाळिंब येथील लेचरूड वस्ती परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत गुरुवारी (ता. 8) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाच्या पाठीला सुमारे 15 ते 16 किलो वजनाचा दगड बांधलेला होता. तसेच मृतदेह तारेने बांधण्यात आला होता. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून खून असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृत तरुणाचे नाव भीमाशंकर धोंडीबा खंडागळे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर हे फुरसुंगी येथे पत्नी व मुलांसह राहत होते. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ते डाळिंब येथे आई नंदा खंडागळे यांना भेटण्यासाठी आले होते. घराचे बांधकाम पाहिल्यानंतर काही वेळ आराम करून सायंकाळी सहाच्या सुमारास ‘उरुळी कांचनला जाऊन येतो’, असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी डाळिंब, उरुळी कांचन परिसर तसेच नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, पाच दिवस उलटूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता व्यक्त करत त्यांच्या आईने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)


दरम्यान, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास लेचरूड वस्ती परिसरातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत भीमाशंकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, रुग्णवाहिका चालक संतोष झोंबडे, माऊली लाड आणि रतन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.विहीर खोल असल्याने तसेच मृतदेहाची अवस्था खराब झाल्याने तो बाहेर काढणे आव्हानात्मक होते. नातेवाईकांनी नाकाला रुमाल लावून काही अंतरावर थांबणे पसंत केले; मात्र कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावत विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. पाठीला दगड बांधलेला आणि शरीर तारेने बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे.

भीमाशंकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांना विहिरीत ढकलण्यात आले का? त्यांच्या पाठीला एवढा मोठा दगड कोणी आणि का बांधला? मृतदेह तारेने का बांधण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Thursday, 8 October 2026, 17:41

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45
Next Post

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp