Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 17:41

सागर जगदाळे

भिगवण: माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, तरी त्याच्या मनाची नाळ आपल्या मातीशी आणि बालपणाशी जोडलेलीच राहते. ज्या शाळेच्या अंगणात अक्षरांची पहिली ओळख झाली, ज्या शिक्षकांच्या संस्कारांनी व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आणि ज्या शिक्षणाच्या बळावर समाजात ताठ मानेने उभे राहता आले, त्या शाळेचे ऋण आयुष्यभर मनात जपले जाते. याच कृतज्ञतेची आणि मातीशी असलेल्या अतूट नात्याची भावस्पर्शी प्रचिती तक्रारवाडी येथे आली.

तक्रारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त आर्मी अधिकारी सुहास धुमाळ यांनी आपल्या शाळेच्या ऋणाची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एआय डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट पॅनल शाळेला भेट स्वरूपात दिले. लाखो रुपये किंमत असलेल्या या आधुनिक शैक्षणिक साधनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुली होणार आहेत.

आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रातही झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारवाडीतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाचा अनुभव मिळावा, अवघड विषय चित्र, व्हिडिओ, अॅनिमेशन आणि परस्परसंवादी पद्धतीने सहज समजावेत, तसेच विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची उत्सुकता वाढावी, या उद्देशाने सुहास धुमाळ यांनी हा पॅनल शाळेला प्रदान केला.

 

या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञानावर अवलंबून न राहता दृश्य आणि अनुभवाधारित शिक्षण घेता येणार आहे. डिजिटल माध्यमातून विविध शैक्षणिक संकल्पना अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने ग्रामीण भागातील शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे.

या एआय डिजिटल पॅनल प्रदान समारंभाचे आयोजन तक्रारवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच सुहास धुमाळ यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि अन्य आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. पॅनल शाळेला प्रदान होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि कुतूहल या उपक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करत होते.
यावेळी तक्रारवाडीचे माजी सरपंच शरद वाघ, माजी सरपंच सतीश वाघ, स्वातंत्र्यसैनिक मारुती धुमाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा धुमाळ, माजी मुख्याध्यापक विलास गडकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयदीप जाधव, सदस्य माऊली जगदाळे, गणेश जाधव, सचिन वाघ, शामराव परकाळे, नितीन काळंगे, पोलीस अकॅडमी संचालक रणवीर टकले, मुख्याध्यापक राजेश नाचण यांच्यासह पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी या उपक्रमाबद्दल सुहास धुमाळ यांचे आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या गरजा ओळखून आधुनिक शैक्षणिक साधन उपलब्ध करून देणे ही विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर माजी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले, तर आभार पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी मानले.

“शाळेचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न…”

“तक्रारवाडीच्या मातीशी आणि माझ्या शाळेशी माझे नाते कायमचे आहे. या शाळेने मला घडवले, संस्कार दिले आणि आयुष्यात उभे राहण्याची ताकद दिली. सेवानिवृत्तीनंतर या शाळेसाठी काहीतरी करता यावे, या भावनेतून एआय डिजिटल पॅनल भेट दिला. गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी, हाच या उपक्रमामागचा आनंद आहे.”
सुहास धुमाळ, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलिसांची उद्घोषणा; विद्यार्थी ठाम! एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाचा तिढा कायम; मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका

Thursday, 8 October 2026, 19:04

इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ मोटारसायकल घसरून व्यक्तीचा मृत्यू

Thursday, 8 October 2026, 18:43

शाळेचे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्याने लाखो रुपयांचे एआय डिजिटल पॅनल दिलं भेट

Thursday, 8 October 2026, 17:41

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45
Next Post

इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ मोटारसायकल घसरून व्यक्तीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp