आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील चिंदादेवी गावाजवळ पडस्थळ–चिंदादेवी रस्त्यावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात मगन कैलास ब्रामणे (वय ४४, सध्या रा. शिरसोडी, ता. इंदापूर; मूळ रा. अंबा पाडाव, ता. बायगोरे, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा करण मगन ब्रामणे (वय २०) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ८) सकाळी सातच्या सुमारास मगन ब्रामणे हे एमएच ४२ व्ही ३०६६ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पडस्थळ–चिंदादेवी रस्त्याने घरी येत होते. त्यावेळी त्यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटारसायकल भरधाव वेगाने चालविल्याने मोटारसायकल घसरून रस्त्यावर पडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून मोटारसायकलचेही नुकसान झाले.

याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार यादव (बकल नं. २५०) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार बोराडे (बकल नं. २१४०) यांनी केली.







