Sunil Gavaskar | मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज केकेआरविरुद्धचा सामना जिंकून थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. मात्र कोलकाताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या पराभवामुळे चेन्नईची प्ले ऑफ मध्ये जाण्याची प्रतीक्षा लांबली असली तरी सामन्यानंतर जे घडले त्यामुळे चाहते भावूक झाले.
गावस्कर यांच्या शर्टवर धोनीचा ऑटोग्राफ….
चेपॉक मैदानावर रविवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी स्टेडियममध्ये फिरत होते. यावेळी आयपीएलमधील कॉमेंट्री टीममध्ये असलेले टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर धोनीकडे धावत येऊन ऑटोग्राफ मागतात. यावर धोनी हसतो आणि गावस्कर यांच्या शर्टवर ऑटोग्राफ देतो. हा क्षण पाहून स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते भावूक झाले होते.
रिंकू आणि वरुणनेही घेतला ऑटोग्राफ…
सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टवर सध्याच्या खेळाडूचा ऑटोग्राफ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गावस्कर हे १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होते. तर २०११ मध्ये टीम इंडियाच्या विश्वचषक विजेता संघाचे नेतृत्त्व एम.एस. धाेनीने केले हाेते. ऑटोग्राफ घेतल्यानंतर धाेनीने गावस्कर यांना अलिंगन दिले. यानंतर दाेघेही हसत हसत तेथून निघून गेल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. केकेआरचा रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनीही सामन्यानंतर धोनीचा ऑटोग्राफ त्यांच्या जर्सीवर घेतली.
आयपीएलमध्ये एकाच संघाचा २०० सामन्यांत कर्णधार असणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याबद्दल गावस्करने धोनीचे कौतुकही केले आहे. ते म्हणाले की, सीएसकेला कठीण परिस्थितीतून बाहेर पडणे माहित आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे. २०० सामन्यांचे नेतृत्व करणे खूप कठीण आहे. इतक्या सामन्यांचे कर्णधारपद हे एक ओझे आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो, पण माही वेगळा आहे. त्याच्यासारखा कर्णधार कधीच झाला नाही आणि भविष्यातही त्याच्यासारखा कोणी नसेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम