पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत पुणे पोलीस दलास नेमबाजीमध्ये विजेतेपद मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुटींग पुरूष, शुटींग महिला आणि शुटींग सर्व्हिस वेपन या तिन्ही प्रकारामध्ये विजेतेपदाचे करंडक प्रधान करण्यात आले. ही स्पर्धा (दि. ७ ते १३ जानेवारी २०२३) दरम्यान संपन्न झाली. पदकविजेत्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक आणि अपर आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.
विजेतेपद मिळालेल्या पोलिसांची नावे :
पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण – पिस्टल – कांस्य पदक
सहाय्यक निरीक्षक राकेश कदम – पिस्टल – एक सुवर्ण व दोन रौप्य पदक
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे – रायफल – कांस्य पदक
पोलिस अंमलदार राजेंद्र पाटील – पिस्टल – 5 सुवर्ण, एक कांस्य, रायफल – 2 सुवर्ण, पिस्टल व एमपी 5 – बेस्ट शुटर ट्रॉफी
पोलिस अंमलदार अमोल नेवसे – रायफल – सुवर्ण
पोलिस अंमलदार महेश जाधव, रायफल – एक सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्य
पोलिस अंमलदार अनिल उकरे – रायफल – एक कांस्य
पोलिस अंमलदार मंगेश खेडकर – रायफल – एक कांस्य
पोलिस अंमलदार दत्तात्रय खाडे – पिस्टल – एक सुवर्ण, एक रौप्य
पोलिस अंमलदार यास्मीन सय्यद – पिस्टल – एक कांस्य
पोलिस अंमलदार वैशाली गोडगे – पिस्टल – तीन रौप्य