Sports News : पुणे : मोहली येथील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्स राखून पराभव करत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया वनडे, कसोटी आणि टी२० मध्ये अव्वल स्थान पटकावले. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशिया मधील पहिला संघ ठरला आहे.
अशी कामगिरी करणारा भारत हा आशिया मधील पहिला संघ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २७७ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान मोबदल्यात पार करत मालिकेत १.० अशी आघाडी घेतली आहे. (Sports News) तब्बल २७ वर्षानंतर मोहालीमध्ये ऑस्ट्रलियाच्या नांग्या ठेचण्यात भारतीय संघाला यश लाभले. १९९६ मध्ये भारताने मोहलीमध्ये ऑस्ट्रलियाचा पराभव केला होता.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी –
भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. (Sports News) आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे ११५ रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
दरम्यान, टी२० क्रमवारीत भारतीय संघ २६४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ टी२० क्रमवारीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. (Sports News) मात्र, भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत कसोटी, एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटमध्ये नंबर-१ संघ बनून इतिहास रचला आहे. याआधी २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sports News : विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत जावकरचा पराभव; रौप्यपदकावर मानावे लागले समाधान