Sports News : नवी दिल्ली : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अम्पायरसोबत केलेल्या गैरवर्तनावर हरमनप्रीतने मौन सोडले असून, ढाका इथे झालेल्या सामन्यातील कृत्याचा कोणताही खेद वाटत नसल्याचे तिने म्हटले आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने कारवाई केली आहे. तिच्यावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ती आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार आहे. (Sports News)
हरमनप्रीत कौरवर आयसीसी ची कारवाई;
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने बाद दिल्यानंतर हरमनने गैरवर्तन करत बॅट स्टम्पवर मारली होती. तसेच सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधाराने अम्पायरवर सडकून टीका केली होती. याची दखल घेत आयसीसीने हरमनप्रीत कौरवर कारवाई केली. हरमनप्रीत सध्या ‘द हंड्रेड’मध्ये खेळत असून, एका मुलाखतीत बोलताना तिने म्हटले, ‘मी असे म्हणणार नाही की मला कोणत्याही गोष्टीचा खेद वाटतो. कारण एक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी ठीक आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे’. (Sports News)