ICC Cricket World Cup 2023 Final : पुणे : आज आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तगडे संघ आज विश्वचषक मिळवण्यासाठी मैदानात उतरतील. फायनलमध्ये हे दोन संघ पोहोचल्यामुळे भारतीयांना 2003 सालचा विश्वचषक आठवतोय. तेव्हाच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आज रोहित सेनेला मिळाली आहे.
सोशल मीडियालवर खच्चीकरण
2003 साली अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला होता. यानंतर पराभूत झालेली गांगुली सेनेच सोशल मीडियालवर खच्चीकरण करण्यात आले. तेव्हाची परिस्थीती पाहून आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना आणि टीममधील सर्व सदस्यांना सोशल मिडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मोहम्मद कैफ यांच्या घरावर हल्ला झाल्याचं प्रकरण घडलं होतं. देशातील नागरिक काही प्रमाणात नाराज देखील होते. मात्र, या सगळ्यात सहारा समूहाच्या सुब्रतो रॉय यांनी भारतीय क्रिकेट टीमला एक मोठी भेट दिली होती. ही माहिती मात्र, देशातील तेव्हाच्या दूषीत वातावरणात पूर्णत: मीटून गेली होती.
सुब्रतो रॉय यांच्या मोठ्या मनाचा अनुभव
सुब्रतो रॉय यांनी भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गेल्यास सर्व खेळाडूंना घर देण्याचं वचन दिलं होतं. हेच वचन पूर्ण करत, त्यांनी लोणावळ्यातील ‘अॅम्बी व्हॅली’मध्ये सर्व खेळाडूंना प्रत्येक एक सात-बेडरुमचे डीलक्स अपार्टमेंट देण्यात आले. 26 जानेवारीच्या मुहूर्तावर आयोजित एका कार्यक्रमात ही घरं खेळाडूंना भेट करण्यात आली.
दिया मिर्झा, नेहा धुपियाची उपस्थिती
‘अॅम्बी व्हॅली’ ही लोणावळ्यामध्ये सुमारे 5,000 एकरांवर उभारण्यात आली आहे. खेळाडूंना दिलेली घरे ही सुमारे 1600 स्क्वेअर फीट एवढी मोठी आहेत. या घरांची मार्केट व्हॅल्यू ही त्या काळी 1.75 कोटी रुपये एवढी होती. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा, नेहा धुपिया यादेखील उपस्थित होत्या. सोबतच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनीही या कार्यकमाला उपस्थिती दर्शवली होती.