बंगळुरु : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरु आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाला 46 धावांवर सर्वबाद केल्यानंतर 3 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी होती. दुसरा दिवस न्यूझीलंडने गाजवल्याने तिसऱ्या दिवशी टीम इंडिया कमबॅक करेल, अशी अशा असताना त्यानुसार टीम इंडियाने न्यूझीलंडला ठराविक अंतराने 4 झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 7 बाद 233 अशी झाली होती. परंतु, त्यानंतर टीम साऊथी आणि रचीन रवींद्रने टीम इंडियावर आक्रमण करत करत बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. रचीनने या दरम्यान टीम इंडियाविरुद्ध शानदार शतक ठोकलं आहे.
न्यूझीलंडच्या या 24 वर्षीय फलंदाजाने टीम इंडिया विरुद्ध जबरदस्त बॅटिंग करत फक्त 124 बॉलमध्ये 11 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 86.67 च्या स्ट्राईक रेटने आपलं शतक पूर्ण केलं. रचीनच्या कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं आहे. रचीन आणि टीम साऊथी या जोडीने टीम इंडियावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. रचीनने एका बाजूला टीम इंडियाला बॅक फुटवर ढकललं. तर दुसऱ्या बाजूने टीम साऊथीने आक्रमक साथ दिली. टीम इंडियाचे गोलंदाज या जोडीसमोर निष्प्रभ ठरताना दिसून आले.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.