लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पाचगणी येथील बिलिमोरीया हायस्कूलच्या मैदानावर विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. धनुर्विद्या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतून आलेल्या १,२५० स्पर्धकांनी दमदार कामगिरी केली. स्पर्धेतील एकूण ७२ विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. बिलिमोरीया हायस्कूलच्या कार्यकारी संचालिका आदिती गोराडीया यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
आदिती गोराडीया यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
या वेळी सातारा जिल्हा क्रिडा विभागाचे सहाय्यक अधिकारी सुनिल कोळी, आशियाई स्पर्धा कांस्यपदक विजेती खेळाडू आदिती स्वामी यांच्या मातोश्री तसेच सर्व जिल्ह्यांतून आलेले जिल्हा आर्चरी प्रमुख व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उपस्थित होते. (Pachgani News) बिलीमोरीया हायस्कूलतर्फे आलेल्या स्पर्धकांचे व मान्यवरांचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आले.
स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. कंपाऊंड इन्डियन तसेच रिकर्व राउंड या प्रकारात १४, १७ तसेच १९ वर्षांखालील मुले आणि मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. (Pachgani News) शाळा प्रशासनाने अतिशय सुरेख नियोजन केले होते. याबद्दल मान्यवरांनी बिलिमोरिया हायस्कूल प्रशासनाचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : आंब्रळच्या उपसरपंचपदी भानुदास बिरामने बिनविरोध
Pachgani News : क्रीडा स्पर्धांमुळे खिलाडू वृत्ती वृद्धिंगत होण्यास मदत- डॉ. समीर पवार
Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंडवरील अनधिकृत पत्र्याच्या स्टाॅलवर कारवाई