IPL Final : मुंबई : आयपीएल 2023चा अंतिम सामना उत्सुकता लागून राहिली आहे. रविवार अंतिम सामन्याचा थरार रंगणार होता. क्रिकेट प्रेमींच्या आनंदावर पावसाच्या पाण्याचे विरजण पडले. त्यामुळे मैदानावरील तसेच बाहेर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. मात्र 29 मे रोजी राखीव दिवशी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे अंतिम सामना 20-20 षटकाचा होईल अशी आशा आहे. (The thrill of the final match will be played today; What will be the weather in Ahmedabad today)
आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होत आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने 28 मे रोजी खेळ होऊ शकला नाही. मैदानावर चाहत्यांची यामुळे निराशा झाली.
आज अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी
Accuweatherच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादमध्ये आज सकाळी कडक ऊन असणार आहे. मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण असेल. सायंकाळी चार ते 6 वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. (IPL Final ) रविवारी सामन्याच्या वेळेत जोरदार पाऊस झाला. पण सोमवारी सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता कमी आहे.
सामन्याआधी पावसाची शक्यता असून त्यामुळे आउट फिल्ड ओलसर होईल. ते कोरडं करण्यासाठी ग्राउंड्समनना कष्ट करावे लागेल. यामुळे टॉससाठी थोडा वेळ होऊ शकतो. (IPL Final ) सामन्यावेळी अमहदाबादचे तापमान जास्त असेल. यामुळे खेळाडूंना खेळताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच सायंकाळी मैदानावर ढग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाजांना पोषक असं वातावरण असू शकते.
हवामानाबद्दल निश्चितपणे काही सांगणे कठीण आहे. त्यामुळे आजही पाऊस झाला तर काय असा प्रश्न चाहत्यांना आहे. पावसामुळे एकही चेंडू टाकता न आल्यास अंपायर कट ऑफ टाइमसाठी 12.06 मिनिटांपर्यंत वाट पाहतील. त्यानंतर 5-5 षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. (IPL Final ) जर असंही नाही झालं तर सुपर ओव्हरसाठी काही वेळ थांबतील. अंपायर्सना वाटलं की वातावरण जास्तच खराब आहे आणि सामना होऊच शकत नाही. तेव्हा पॉइंट टेबलच्या आधारे विजेता घोषित केला जाईल आणि यामध्ये गुजरात टायटन्स बाजी मारेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले ; व्हिडीओ व्हायरल…