IPL 2025 : मागील वर्षी पर्यंतचा मुंबई इंडियन्सचा सलामीचा फलंदाज ईशान किशनने आयपीएल 2025 मध्ये नवीन संघात सामील होताच खळबळ उडवून दिली आहे. इशान किशनने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात तुफानी शतक ठोकले आहे.
आज (23 मार्च)ला झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात फक्त 45 चेंडूत ईशान किशनने शतक ठोकले आहे. हे ईशानचं आयपीएल मधलं पहिलंच शतक आहे. मागील काही हंगामात मुंबई इंडियन्ससाठी तो फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला होता. मात्र संघ सोडल्यानंतर इशान किशनने सनरायझर्स हैदराबादसाठीच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकले आहे. मागच्या हंगामानंतर मुंबई इंडियन्सने इशानला रिलीज केले होते.
त्यानंतर त्याला मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र हैदराबाद संघात येताच त्याने आपला खेळ, तुफानी अंदाज दाखवायला सुरुवात केली आहे.