नागपूर: भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवशीय सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना चार विकेट्सने जिंकला आहे. या एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
अधिक माहिती अशी की, भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवशीय सामना चार विकेट्सने जिंकला आहे. या एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज(6 फेब्रुवारी) नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडने 47.4 षटकांमध्ये 248 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने चांगली खेळी करत अवघ्या 38.4 षटकांत चार गडी राखून 251 धावा करत सामना जिंकला आहे.
शुभमन गिलने ठोकले अर्धशतक
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन सात चौकार मारत 60 चेंडूत त्याच्या कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक ठोकले आहे.
यानंतर कटकमध्ये होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ या एकदिवशीय मालिकेत अजिंक्य आघाडी मिळविण्याचा प्रयत्ना करेल. दूसरा एकदिवशीय सामना 9 फेब्रुवारी रोजी कटक येथे खेळला जाणार आहे.