ICC Mens Test Rankings पुणे : पुरुषांच्या आयसीसी क्रिकेट क्रमवारीत आता भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.मागील १५ महिन्यांपासून ऑस्ट्रेलियाकडे असलेलं कसोटी क्रिकेटचं पहिलं स्थान आता भारतीय संघाच्या नावे झालं आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी (WTC) भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना हा अलीकडच्या इतिहासातील सर्वात रोमांचक प्रतिस्पर्ध्यांपैकी एक बनला आहे. दरम्यान, इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने २४ एप्रिल रोजी टीम इंडियाची घोषणाही केली आहे.
आयसीसीनं वार्षिक रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार, भारत सध्या १२१ गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया ११६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आधीच्या रँकीगनुसार, ऑस्ट्रेलिया १२२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता आणि भारत तीन गुणांनी (११९ गुण) पिछाडीवर होता. वार्षिक क्रमवारीत मे २०२० पासून पूर्ण झालेल्या सर्व मालिकांचा विचार केला जातो, मे २०२२ पूर्वी पूर्ण झालेल्या मालिका ५० टक्के आणि त्यानंतरच्या सर्व मालिकांचा विचार केला जातो.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ फायनलसाठी ऑस्ट्रेलियानं संघांची घोषणा केली. ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया संघ टीम इंडियाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम मुकाबला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या १७ खेळांडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियानं खेळाडूंची यादी जाहिर केला आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Wheelchair Cricket : पुण्यात प्रथमच व्हीलचेअर क्रिकेट सुरू; आता महाराष्ट्राची टीम लवकरच होणार सज्ज
IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले ; व्हिडीओ व्हायरल;