पुणे प्राईम न्यूज: भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. विश्वचषक सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत, पण भारताने अद्याप विश्वचषक मोहीम सुरू केलेली नाही. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तसेच जगभरातील क्रिकेट चाहत्यांना चेन्नईच्या हवामानाची स्थिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
चेन्नईत आज हवामान कसे असेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियमवर होणार्या विश्वचषक सामन्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्यावेळी स्टेडियमभोवती ढगही होते. गेल्या आठवडाभरापासून चेन्नईमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. मात्र, रविवारी खेळावर पावसाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. रविवारी हवामान मोठ्या प्रमाणात स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअसच्या, तर आर्द्रता 70 च्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून, त्यावेळी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के आहे.
मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना काटे की टक्कर असणार आहे. नुकतीच या दोन संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, जी भारताने 2-1 ने जिंकली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने चेन्नईमध्ये आतापर्यंत एकूण 6 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 5 जिंकले आहेत आणि फक्त 1 सामना गमावला आहे. तर चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2 आणि भारताने फक्त 1 सामना जिंकला आहे.
हेही वाचा:
Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली