पुणे : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. आज मैदानावर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची भेट झाली.
कोहलीने बाबरसोबत हात मिळवला. थोडा वेळ त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानी संघातील इतर सदस्यही त्यांना पाहून हसत होते. बाबर आणि विराटची तुलना नेहमीच केली जाते. बाबरने फार कमी कालावधीत आपले नाव कमावले असून त्याची तुलना कोहलीशी केली जाते.
Hello DUBAI ????????
Hugs, smiles and warm-ups as we begin prep for #AsiaCup2022 #AsiaCup | #TeamIndia ???????? pic.twitter.com/bVo2TWa1sz
— BCCI (@BCCI) August 24, 2022
हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर वातावरण तापले. सामन्यापूर्वी विराट कोहली आणि बाबर आझमची अशी भेट चाहत्यांनी पाहिली, त्यानंतर सोशल मीडियावरही खळबळ उडाली. यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करू लागले. एका यूजरने लिहिले की, कोहली साहेबांना भेटल्यानंतर बाबर आझमला धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये कोहलीशिवाय हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक आणि अर्शदीप सिंगसह इतर खेळाडू देखील दिसले. चहल आणि हार्दिक यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भेट घेतली.
दहा महिन्यांनंतर २८ ऑगस्ट रोजी दुबईत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. दोघेही २४ ऑक्टोबर २०२१ रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकाच मैदानावर खेळले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने १० विकेट्सने विजय मिळवला होता. आशिया चषकातील भारत-पाक संघर्षाबद्दल बोलायचे झाले तर येथे टीम इंडियाचा वरचष्मा आहे. त्यांनी १४ पैकी आठ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत.
आशिया कपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ :
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.