Baramati News : बारामती : पुणे : बारामती येथील रुचिता क्षीरसागर हि नऊ वर्षीय चिमुकली गायनातून साक्षरतेचा प्रचार करीत आहे. तिचा व्हिडिओ उल्लास या फेसबुक पेज वर पोस्ट केला आहे .
साक्षरतेचा जागर
72 वर्षीय निरक्षर सुशीला आजी हिला शिकवतानाच्या तिच्या प्रेरणादायी छायाचित्राची यापूर्वी केंद्र व राज्यानेही प्रशंसा केली होती राज्याचे योजना शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी बारामती येथे दोघींचा गौरव केला आहे.
चालू वर्षी 8 सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनी महाराष्ट्रात नवभारत साक्षरता अभियानाची सुरुवात करण्यात आली असून निरक्षर आणि स्वयंसेवकांसाठी या दोघी आजी नातींचे या छायाचित्र प्रेरणादायी ठरत आहे त्यांचे मूळगाव टोणेवाडी (ता. बार्शी) असून तीन वर्षांपूर्वी ते बारामतीत स्थलांतरित झाले आहेत.
सुशीला आजी मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्यांचा साक्षरता वर्ग नातीने घरीच सुरू केला आहे रुचिता हिने आजीला शिकविण्याबरोबरच ‘हम मिल जुलकर तिखते पढ़ते जाएँगे’ या हिंदी गीतातून सावित्रीबाईंच्या वेशात साक्षरतेचा जागर सुरू -केला आहे तिचा स्तुत्य उपक्रम देशभर पोहोचावा म्हणून केंद्राने नवभारत साक्षरतेच्या उल्लास फेसबुक पेजवर तिचा हा व्हिडिओ प्रशंसा करीत पोस्ट केला.
योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी बारामती येथे त्यांच्या घरी भेट देऊन आजी नातीचा गौरव केला यावेळी माजी शिक्षणाधिकारी पोपट काळे, राजेश क्षीरसागर, ज्योती क्षीरसागर, आबा जगताप, गौरव माने सारिका माने, विठ्ठत साळवे उपस्थित होते. रुचिता ही अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीमध्ये तिसरीत शिकत असून तिला संगीत शिक्षिका जयश्री कुलकर्णी, सुवर्णा जमदाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.