राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत येथील श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्ट आयोजित श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव २०२३ मधील ‘होम मिनिस्टर’ या पैठणीच्या खेळाच्या मानकरी रश्मी दरेकर या ठरल्या आहेत. वैभव रायकर यांच्या हस्ते पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
वैभव रायकर यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मान
महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांच्या आवडत्या ‘होम मिनिस्टर’ (खेळ पैठणीचा) या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. महालक्ष्मी नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने स्रियांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. (Yavat News) आपल्या रंगतदार विनोदी संवाद शैलीने वहिनींची मने जिंकण्याचे काम प्रसिद्ध निवेदक ‘होम मिनिस्टर’ फेम निलेश बोरकर यांनी शाहिद शेख, तुषार कदम, आप्पा जमदाडे, चैतन्य जगताप यांच्या सहकार्याने केले. खेळीमेळीच्या वातारणात कार्यक्रम पार पडला. याचा लाभ परिसरातील अनेक माता-भगिनींनी घेतला. या मंडळाने आजपर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. बऱ्याच वर्षांपासूनची आपली परंपरा व आदर्श यवतकरांसमोर कायम ठेवला आहे.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘दांडिया महोत्सव’ आणि ‘चला हसून जगूया, खेळ पैठणीचा खेळूया’, या सन्मान महिलांचा ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत रश्मी दरेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून यवत येथील पैठणीच्या मानकरी ठरल्या. लाईफ स्टाईल साडीचे मालक वैभव रायकर यांच्या हस्ते त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तृप्ती पांढरे यांनी द्वितीय क्रमांकाची मिनी पैठणी मिळवली, तर सोनल सोनिगरा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ ११ विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. (Yavat News) या वेळी पाककला स्पर्धेतील प्रथम विजेत्या सुजाता पवार, द्वितीय विजेत्या सावित्री महामुनी, तृतीय विजेत्या शुभांगी हरसुले, उत्तेजनार्थ विजेत्या अंजली शहा व जयश्री सस्ते यांसह चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप युवा नेते गणेश शेळके, काश्मिरा मेहता, शितल शेळके, मृणाली अवचट, कांचन दोरगे, रेखा शेळके, शितल दोरगे, पूनम जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी गणेश शिंदे, अजिंक्य महाडिक, मयूर धोत्रे, वामन जाधव, गौरव पटवा, मंगेश मासुळे, ऋषिकेश पटवा, अभिषेक शेळके यांच्यासह पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : दहिटणे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला महाभोंडल्याचा आनंद