राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : यवत येथे श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव २०२३ निमित्त खास महिलांसाठी व गावातील नागरिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला शशिकांत कोठावळे प्रस्तुत ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठमोळी बहारदार लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कलाकारांनी मने जिंकली
‘पाटलांचा बैलगाडा’, मॅडम कडक हाय, बाण नजरेचा, लगीन होण्याआधी,’मला वाटलं होतं तुम्ही याल , ….’ अशा वैविध्यपूर्ण ठसकेबाज लावण्या युवा लावणीसम्राज्ञी अर्चना जावळेकर, नृत्यबिजली संगीता लाखे व सहकलाकारांनी सादर केल्या. या सादरीकरणाला उपस्थित महिलांची उत्स्फूर्त दाद मिळाली. पूर्ण भरलेल्या बाजार तळावर अनेकांनी ठेका धरला अन् मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. (Yavat News ) कलाकारांच्या सादरीकरणाला महिला प्रेक्षकांनी टाळ्यांनी दाद देत परिसर दणाणून सोडले. कलाकारांनीही आपल्या अदांनी अन् बहारदार लावण्या सादर करीत मने जिंकली.
नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी एक लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी शशिकांत कोठावळे प्रस्तुत तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमाचे आयोजन बाजार तळावर रंगलेल्या कार्यक्रमात युवा लावणीसम्राज्ञी अर्चना जावळेकर, नृत्यबिजली संगीता लाखे यांच्यासह ड्रीमगर्ल नमिता पाटील, नवतारका किरण पुणेकर, प्राची मुंबईकर यांनी सादरीकरण केले; तर बहारदार निवेदनाने सोमनाथ फड यांनी कार्यक्रमात रंगत आणली. (Yavat News ) हा लावण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. कलाकारांच्या प्रत्येक लावणीला महिला प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला अन् टाळ्यांचा कडकडाट केला.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठाचे पूजन भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश शेळके, डॉ. श्याम कुलकर्णी, सरपंच समीर दोरगे, युवानेते गणेश शेळके, हभप महादेव दोरगे, पप्पू महाडिक आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
अनेक लावण्यांच्या सादरीकरणावर वन्स मोर घेण्यात आला यावेळी नागरिकांच्या शिट्ट्या अन् महिलांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. (Yavat News ) कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या आई भवानी तुझ्या कृपेने या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. या लावणी कार्यक्रमाला रसिक एवढे तल्लीन झाले होते की कार्यक्रम संपला, असे निवेदकांना सांगावे लागले.
यावेळी कलाकारांची कदर करण्यारे यवतसारखे गाव संपूर्ण जिल्ह्यात नसल्याचे संगीता लाखे यांनी सांगितले. श्री महालक्ष्मी माता नवरात्र ट्रस्टने खास महिलांसाठी लावणी कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मासे पकडू देत नाही म्हणून, मिरवडीत एकाला लोखंडी रॉडने मारहाण
Yavat News : यवतच्या रश्मी दरेकर ठरल्या ‘होम मिनिस्टर’मधील पैठणीच्या मानकरी