उरुळी कांचन (पुणे) : विद्यार्थिनींना जगातील विविध देशांची संस्कृती आणि परंपरा चालीरीती समजाव्या तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘हार्मनी हेवन’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला.
सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सुरेश कांचन, शाळेच्या संचालिका नयन कांचन, प्राचार्या डॉ. नुपुर कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
उन्नती कन्या विद्यालयाची स्नेहसंमेलनासाठी यावर्षाची संकल्पना होती ‘हार्मनी हेवन’ म्हणजेच जगाशी सुसंवाद साधने. या कार्यक्रमा मध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देशाची संस्कृती आणि पारंपारिक चालिरीती प्रेक्षकांपुढे उत्तमरित्या सादर केल्या. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली.
यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या देशाची संस्कृती आणि पारंपारिक चालिरीती प्रेक्षकांपुढे उत्तम रित्या सादर केल्या. यामध्ये भारत, रशिया, नेदरलँड, जपान, पश्चिम कोरिया, स्पेन, अमेरिका, इटली, चिन, अरब, पेरू, आफ्रिका आदी देशांची संस्कृती आपल्या नृत्यातून सादर केल्या. न समजणाऱ्या बोलिभाषेवर सुद्धा उन्नती कन्या विद्यालयाच्या नर्सरी ते माध्यमिक च्या विद्यार्थिनींचे नृत्य केले.
दरम्यान, या स्नेहसंमेलनाचा मुख्य हेतु होता की विद्यार्थिनींना जगातील विविध देशांची संस्कृती आणि परंपरा चालिरीती समजाव्यात आणि त्याचबरोबर भारतातील वेगवेगळ्या परंपरा व रितीरिवाज हे समजावेत हा विद्यालयाचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच, विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेतली.