Uruli Kanchan News : उरुळी कांचन, ता. ११ : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानचा रस्ता २० वर्षांपूर्वी ‘बाधा, वापरा व हस्तातंरीत करा (बीओटी)’ या तत्वानुसार आयआरबी (IRB) या खाजगी कंपनीने विकसित केला होता. मात्र, मुदत संपल्याने पाच वर्षांपूर्वी आयआरबीने हा रस्ता शासनाकडे हस्तातंरीत केला.
या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय
कवडीपाट टोलनाका मुदत संपल्याने बंद करण्यात आल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे’ (NHAI) सोपवण्यात आला. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्याची डागडुजी अथवा साफसफाईही केवळ मागील तीन वर्षात केवळ एकवेळेस झाली आहे. Uruli Kanchan News
मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु हळूहळू त्या गायब झाल्या. त्या परत टाकण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फूटपाथ तयार करण्यात आला. पण जाळ्यांची चोरी व्हायला लागली, त्यामुळे खालचा फूटपाथही आपोआपच तुटला. याची दुरूस्ती करण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. Uruli Kanchan News
मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये एक लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु हळूहळू त्या गायब झाल्या. त्या परत टाकण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्या मध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फूटपाथ तयार करण्यात आला. जाळ्यांची चोरी व्हायला लागली तसेच त्यामुळे खालचा फूटपाथही आपोआपच तुटला आहे. याची दुरुस्ती करण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही.
सेवा रस्त्यावरील लोखंडी जाळ्या मोडल्या..
सेवा रस्त्यावर असलेल्या लोखंडी कुंपणाच्या जाळ्या वाकड्या तसेच मोडलेल्या अवस्थेत असून, सेवा रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायाची जाहिरात म्हणून बोर्ड लावलेले आहेत. लोणी काळभोर ते उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्टया, मुख्य रस्ताच सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी आढळून येत आहेत. Uruli Kanchan News
मुख्य रस्त्यावर साचतंय पाणी…
दरम्यान, पावसाने अजूनही जोर धरलेला नाही. मधूनच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी लोणी काळभोर, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन या ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाच्या मध्येच पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यावर पाणी साचून निर्माण होणारे तळे त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यांच्या कामाच्या वेळी पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्याची व्यवस्थाच केली नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे.
ठिकठिकाणी मातीचे ढिगारे..
पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १० ते १५ फुटांवर महामार्गावर साचलेल्या मातीचे ढिगारे गोळा करून ठेवण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला कायम मातीचा खच जमा झालेला आहेत. या मातीवरून घसरून आजपर्यंत बरेच दुचाकीस्वार जखमी व काहींना तर कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींचा मृत्युही झाला आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, प्रवासी, वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ असणाऱ्या एका नर्सरी व्यावसायिकाने महामार्ग व सेवा रस्त्यावरच दुकान थाटले आहे. हा व्यावसायिक रस्त्यावरच खुलेआम रोपांची विक्री करत असून, त्यासाठी सेवा रस्त्यासह महामार्गावरील एका लेनमध्ये गाड्या लावल्या जात आहेत. Uruli Kanchan News
याबाबत बोलताना कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “टोलनाका सुरु होता त्यावेळी रोडची देखभाल व दुरुस्ती होत होती. त्या सुविधा परत बंद झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने रोडची डागडुजी करून नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करून रस्त्याची कामे लवकरात लवकर करावी.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते अक्षय (बंटी) कांचन म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. सेवा रस्त्यावर हातगाड्या, तसेच पथाऱ्या मांडल्याचे चित्र आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. Uruli Kanchan News
दरम्यान, याबाबत ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण’चे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.