उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंगल जगन्नाथ पवार यांची बुधवारी (ता. २४) बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच वैशाली अमित सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच मंगेश कानकाटे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत मंगल पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश कानकाटे यांनी मंगल पवार यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी सतीश कालेकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
या वेळी माजी उपसरपंच वैशाली सावंत, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, बापूसाहेब बोधे, सचिन निकाळजे अश्विनी कड, लिलावती बोधे, राधिका काकडे, पल्लवी नाझिरकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कानकाटे, जयसिंग भोसले, आप्पासाहेब कड, ठकसेन कड, मुकिंदा काकडे, सुरेश भोसले, संतोष काकडे, राजेंद्र शिंदे, लोकेश कानकाटे, योगेश गायकवाड, नितीन कड प्रविण शितोळे, गणेश शितोळे, सुरज बोधे, अजिंक्य कड, शुभम शिंदे, रोहन कानकाटे, चेतन कानकाटे, राजेंद्र मेमाणे, राजाराम भंडारी, निखिल पवार, पप्पू पवार, दिलीप शितोळे, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच मंगल पवार निवडीनंतर म्हणाल्या की, “गावच्या सर्वांगिण विकासकामांसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करु. भविष्यकाळात जास्तीत जास्त विकासकामे करण्यावर माझा भर असणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा आहे.”