Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल २०२३’ चा शुभारंभ बुधवारी (ता. २०) सप्टेंबरपासून होत असून, मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवातही प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रभर गाजलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करून दिल्याने फेस्टिव्हलची धूम प्रेक्षकांना अनुभवास मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने २० ते २८ सप्टेंबर या काळात आयोजित “सोरतापवाडी गणेश फेस्टिवल २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे असतील तर प्रमुख पाहूणे म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, पुणे जिल्हाध्यक्ष उत्तर शरद बुट्टे पाटील, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद उपस्थित राहणार असल्याची भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व व कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन चौधरी यांनी दिली.
या फेस्टिवलमध्ये मंगळवारी (ता. १९) श्रींची प्रतिष्ठापना संध्याकाळी ७ वाजता करण्यात होणार आहे. बुधवारी (ता. २०) कॉमेडी तडका – खेळ पैठणीचा होम मिनिस्टर, गुरुवारी (ता. २१) महाराष्ट्र माझा लोकधारा, शुक्रवारी (ता. २२) मोरूची मावशी, शनिवारी (ता. २३) शिवलीला पाटील यांचे कीर्तन, रविवारी (ता. २४) डान्स व मिमिक्री स्पर्धेचे आयोजन, सोमवारी (ता. २५) झंकार ऑर्केस्ट्रा, मंगळवारी (ता. २६) प्रेम करावे जपून – नाटक, बुधवारी (ता. २७) शिवानीचा नादच खुळा लावण्याचा कार्यक्रम, गुरुवारी (ता. २८) सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणूक, रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.