Uruli Kanchan : उरुळी कांचन (पुणे) : “रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावरील दिव्यांच्या खांबावर फ्लेक्स लावणाऱ्यांनो खबरदार” हा लोणी काळभोर पोलिसांचा इशारा हवेतत विरला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या रस्त्यामधील दुभाजकावरील दिव्यांच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जाहिरातींसाठी लागलेले फ्लेक्स रस्त्यावर पडल्याने, वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काय कारवाई करणार, याकडे पूर्व हवेलीमधील नागरिकांचे लक्ष आहे.
लोणी काळभोर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करणार?
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या रस्ता दुभाजकावर विविध ग्रामपंचायतींनी उभारलेल्या दिव्यांच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावणारा संबंधित जाहिरातदार व फ्लेक्स छापणारे अशा दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पोलिसांना कांही दिवसांपूर्वी दिले होते. (Uruli Kanchan) मात्र, खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कनिष्ठ अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या सहा ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीत रस्त्यांमधील दुभाजकांवर नागरिकांच्या सोयीसाठी पदपथावर दिवे लावले आहेत. ग्रामपंचायतींनी उभारलेल्या या दिव्यांच्या खांबावर जाहिरात करता येत नसतानाही पूर्व हवेलीमधील अनेक हौसे-गवसे फ्लेक्स लावून आपापल्या जाहिराती करत आहेत. मात्र, जाहिरातींसाठी लागलेले फ्लेक्स रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. (Uruli Kanchan) रस्त्यावर पडलेल्या फ्लेक्समुळे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी कांही दिवसांपूर्वी फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर उरुळी कांचन परिसरातील जाहिरातदारांनी जाहिरातींसाठी लावलेले फ्लेक्स काढून टाकले होते. तर लोणी काळभोर व कुंजीरवाडी हद्दीत मात्र जाहिरातींसाठी लावलेले फ्लेक्स काढण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या सहा ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील रस्त्यात लागलेले फ्लेक्स काढून टाकण्याबाबतचे लेखी पत्रही संबधित ग्रामपंचायतींना दिले होते. (Uruli Kanchan) मात्र, अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायतींनी पोलिसांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले.
मागील आठ दिवसांपासून पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा या रस्त्यामधील दुभाजकावरील दिव्याच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली आहे. (Uruli Kanchan) यामुळे यापुढील काळात तरी लोणी काळभोर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करणार का, याकडे पूर्व हवेलीमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे शिवसेना (उबाठा) तर्फे योजनांचा भांडाफोड कार्यक्रम..