Uruli Kanchan : उरुळी कांचन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (CBSE) राष्ट्रीय पातळीवरील घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सायरस पूनावाला इंग्लिश मेडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी खेळाडूंचे उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा देशभर सुरु आहेत. या स्पर्धा झोन अंतर्गत खेळवल्या जात आहेत. साउथ झोन २ मध्ये महाराष्ट्र, गोवा, दिव दमन व दादरा नगर हवेली, कर्नाटक, केरळ व लक्षद्वीप या राज्यांच्या ८ ते ११ या ४ क्लस्टर चा समावेश होता. (Uruli Kanchan ) तर ९ व्या क्लस्टर चे सामने चाळीसगाव (जि-जळगाव) येथील सेंट जोसेफ कॉनव्हंट स्कूलमध्ये पार पडले.
या स्पर्धेत सायरस पूनावाला विद्यालयाच्या कबड्डी संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विद्यालयाचे संघाने सलग ७ सामने जिंकून विक्रम नोंदवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. या सामन्यात विद्यालयाने ६ : ७ अशी चुरस दिली, मात्र आव्हान संपुष्टात आले. (Uruli Kanchan ) यावेळी विद्यालयाला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आशिष क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त व प्राचार्या यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेते खेळाडू, क्रीडा शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धेत सायरस पुनावाला स्कूलच्या खेळाडूंनी तिसरा क्रमाक मिळवून बाजी मारली आहे. (Uruli Kanchan ) त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
शुभांशू विजय जाधव, सुजल गणेश कांचन, अर्जुन सिंग विक्रम सिंग नेगी, हर्षवर्धन बापू कोळपे, साई अमोल कांचन, सुमित रेवनसिद्धप्पा हुंडगी, आर्यन अतुल चौधरी, यश रोहिदास कांबळे, आदित्यराज बाळासाहेब म्हस्के, पृथ्वीराज नितीन तुपे, राज रोहिदास कांबळे, यश दत्तात्रेय शितोळे
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे साखळी उपोषण..