Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी योगेश चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नायगावचे सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. (Uruli Kanchan) सरपंच पदासाठी अश्विनी चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी अश्विनी चौधरी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा मनोदय
अश्विनी चौधरी यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. निवडणूक सहाय्यक ग्रामसेवक विजय भगत यांनी कामकाज पार पाडले.
यावेळी पॅनलप्रमुख राजेंद्र चौधरी, उपसरपंच संगीता शेलार, सदस्य गणेश चौधरी, कल्याणी हगवणे, दत्तात्रय बारवकर, उत्तम शेलार, पल्लवी गायकवाड बाळासाहेब गायकवाड, (Uruli Kanchan) प्रियंका गायकवाड, आरती चौधरी, भाऊसाहेब चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, नितीन हगवणे, किरण गुळुंजकर, नवनाथ गायकवाड महिला परिवर्तन ग्रुप, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच अश्विनी चौधरी म्हणाल्या, “महिलांच्या समस्या-गर्जा जाणून घेऊन महिलांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, (Uruli Kanchan) प्रस्तावित विकास कामे यासाठी श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या धोरणाप्रमाणे संपूर्ण गावचे विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात फूड फेस्टीवल..