पुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा पार पाडणार असून, याच कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळत आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते शनिवारी (ता. २४) रायगडावर उपस्थित राहणार आहेत. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे. येथेच लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचं नवीन चिन्ह… #तुतारी
वाजली #तुतारी म्हणजे लढाईला तोंड फुटलं…#तुतारी वाजवा अन् अहंकारी विचारांना गाडा..#तुतारी वाजवा अन् महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा..#तुतारी वाजवा अन् स्वराज्य परत आणण्यासाठी लढा.. #तुतारी वाजवा… pic.twitter.com/c0OcjKuFrE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 22, 2024रायगड” href=”https://marathi.abplive.com/raigad” data-=””> type=”interlinkingkeywords”>
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिल्यानंतर त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. याच चिन्हावर शरद पवार गट पुढच्या निवडणुका लढवणार आहे.