Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : दोन हजार रुपयांच्या नोटा देण्याच्या बहाण्याने महिलेने सराफाच्या व्यवस्थापकाला तब्बल २ लाख रुपयांचा गंडा घालत्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगून त्याचे डिझाईन घेण्यासाठी या, असे सांगून तुमच्या सुट्टे पैसे असतील, तर घेऊन या मी बदल्यात २ हजार रुपयांच्या नोटा देते असे सांगत फसवणूक केली. वाघोलीत हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी सराफ व्यवस्थापकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
वाघोलीत एका सरफाला महिलेने सोन्याचे दागिने बनवायचे असल्याचे सांगितले. दागिन्यांचे डिझाईन मोबाईलमध्ये आहे. ते पाहून माप घेण्यासाठी बोलावले. यावेळी तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील तर ते घेऊन या माझ्याकडे ४ लाख रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा आहे असे या महिलेने सांगितले.
त्यानुसार सरफाचा व्यवस्थापक केअर हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे एक मुलगा त्यांना घेऊन तिसर्या मजल्यावर गेला. आई आतमध्ये आहे, त्यांच्याकडून माप घ्या व पैसे घ्या असे सांगून त्यांच्याकडील २ लाख रुपये घेऊन तो खाली गेला. दरम्यान व्यवस्थापक आत गेला असता तिथे मात्र कोणाचं नव्हतं, त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Lonikand Crime : केसनंद येथील तरूणाला धारदार शस्त्राने जखमी करून लुटणार्या दोघांना बेड्या