दिनेश सोनवणे
दौंड : पुणे आणि परिसरातील शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असून अनेक वहाने शहरातून जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने रिंगरोडची मागणी आमदार राहुल कुल यांच्याकडून नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली.
शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्याबरोबरीने वहातुकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यात अनेक जड वहाने देखील शहरातून ये जा करत असतात. त्यामुळे स्थानिकांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने शहराच्या रिंगरोडचा प्रश्न तातडीने हाती घ्यावा, जेणे करून शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. याच उद्देशाने दौंडचे आमदार राहुल कुल यांनी याप्रश्न हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला.
याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी पश्चिम भागातील निवाडे हे फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर सुमारे पुढील दोन महिन्यांच्या काळात ही रक्कम अदा केली जाणार आहे. तसेच पूर्ण भागातील निवाडे हे जून महिन्यापूर्वी संपविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
या प्रकल्पासाठी १०५२० कोटी रुपयांचे कर्ज घेणार असून त्यातील पहिला हप्ता ३५०० कोटी आपण घेणार आहोत. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात काम सुरु होण्यासाठी ऑकटोबर २०२३ उजाडणार असून डिसेंबर २०२६ पूर्वी हे काम संपुष्टात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
बंदनळी कालवा तयार करून उपलब्ध जागेचा वापर वाहतुकीसाठी…
आज हिवाळी अधिवेशनात आर्धातास चर्चेच्या माध्यमातून आमदार राहुल कुल यांनी आणखी एका महत्वाची मागणी केली. खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी वाहून नेण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. तेव्हा खडकवासला कालवा ते फुरसुंगी पर्यंत बंदनळी कालव्याची निर्मिती करून उपलब्ध जागेचा वाहतुकीसाठी करता येऊ शकेल, अशी मागणी आमदार कुल यांनी यावेळी बोलताना केली.