सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
सासवड: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सासवड या ठिकाणी नागरिक भेट व सुसंवाद मेळावा पार पडला आहे. वार्षिक निरीक्षण अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड येथे भेट दिली. या मेळाव्यात आगामी काळात येणारे सण, उत्सव, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने तयारी आढावा बैठक घेण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमात यावेळ उपविभागातील गुन्हे उकल, दोष सिद्धी, मुद्देमाल निर्गती, एन. डी. पी. एस गुन्हे यासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर सुनील प्रभारी यांनी उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी यांना मार्गदर्शन केले. या सुसंवाद मेळाव्यात दुय्यम पोलीस अधिकारी यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. सुनील फुलारी यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांशी थेट संवाद साधला. सदर वेळी नागरिकांनी आपले मनोगतही व्यक्त केले आहे.
दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाले दरम्यान या खास प्रसंगी त्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आहे. संवाद साधतांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले कि, “आम्ही लोकसेवक आहोत, जनतेच्या सेवेसाठी आहोत, प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्या अडीअडचणी स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी निर्भया पथकमुळे शालेय विद्यार्थ्यांना योग्य मदत होत आहे. तसेच हद्दीत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे तपास त्यात मिळालेले मुद्देमाल परत करणे, तसेच ठराविक मुद्देमालाची कायदेशीर विलेवाट लावण्यात येत आहे. सदर बाबत शासनाकडून शासकीय कार्यालयाचे मूल्यमापन करण्यात येत आहे”
दरम्यान, त्यांनी मनोगत व्यक्त करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. या भेटीतून जनता व पोलिसांमध्ये सुसंवाद राहून, त्यांच्या मधील नातेदृढ होण्यास मदत होत आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी म्हणाले आहेत.
सदर मेळाव्या दरम्यान पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, तसेच उपविभागातील सासवड, जेजुरी, भोर, राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकारी हे उपस्थित होते.