पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली, तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये आहे. एकीकडे शरद पवार यांच्याविषयी सहानभूतीची लाट, तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकासकामांच्या उपकाराखाली दबलेला मतदार अशा द्विधा मनस्थितीतील बारामतीच्या मतदारांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न पडला होता. प्रचारात अजित पवारांबरोबर; पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणाच्या पारड्यात मते टाकायची, हाच यक्षप्रश्न पडला होता.
दरम्यान, बारामतीत मतमोजणी सुरु झाली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्या फेरी अखेर १४००० मतांनी आघाडीवर आहेत.