भोर : करंदी खेडेबारे येथील सराईत हातभट्टीवाल्यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली आहे.
निहाल रविंद्र कुंभार (वय २५, रा. करंदी खेडेबारे, ता. भोर, जि. पुणे) या हातभट्टी चालवणाऱ्या व्यक्तीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली. या आरोपीला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांमार्फत पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाकडील आदेश मंजूर केला.
कुंभार हा गेले दोन वर्षांपासून शोध घेवूनही सापडत नव्हता. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यानी सहायक फौजदार एस. यु. ढावरे, पोलीस हवालदार अजित माने, पोलीस हवालदार भगिरथ घुले यांना याबाबत आदेश दिले होते. संबंधित स्थानबद्ध व्यक्तीला ताब्यात घेवून, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाजी देठे, सहायक फौजदार एस. यु. ढावरे, सहायक फौजदार सतिश चव्हाण, पोलीस हवालदार अजित माने, पोलीस हवालदार भगिरथ घुले, पी. आर. शिंदे यांनी केली आहे.