Shirur News : शिरूर : राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज बांधव एकवटले आहेत. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरखेड (ता. शिरुर) येथे सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.
पिंपरखेड येथे राजकीय नेत्यांना गावबंदी
शिरुर तालुक्यातील बेट भागात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पिंपरखेड हे पहिले गाव ठरले आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून, (Shirur News) त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी पिंपरखेड येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत पिंपरखेड गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक लावले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास राजकीय पक्षाचे नेते जबाबदार असून, निवडणुकीत मतदानासाठी आरक्षणाचे आश्वासन देऊन मराठा समाजाला झुलवत ठेवणारे राजकीय पक्षाच नेते मराठा आरक्षणाला सर्वस्वी जबाबदार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत त्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. (Shirur News) पिंपरखेड येथे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते नरेंद्र बोंबे व हेमंत नरवडे यांनी सांगितले.
नेत्यांना प्रत्येक कार्यक्रमांना मज्जाव असणार का?
सकाळी गावागावात दशक्रियेचे कार्यकम असतात. या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी नेतेमंडळी गर्दी करतात. या नेत्यांनाही येथे बंदी घालण्यात येणार का? प्रत्येक गावागावांत कार्यक्रम होत असतात.(Shirur News) नेत्यांना आवर्जून कार्यक्रमाला बोलावले जाते. मराठा आरक्षणासाठी या कार्यक्रमांना येण्यास देखील नेत्यांना मज्जाव करण्यात येणार का? नेत्यांना गावबंदी अशा फलकामुळे नेते मंडळीची गाव वारी थांबणार का? अशी चर्चा होत आहे..
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा एकच निर्धार ‘आधी आरक्षण, मग इलेक्शन’
Shirur News : कवठे येमाई येथे मराठा समाजाचे चक्री उपोषण; गावात पुढार्यांना प्रवेश बंदी…!
Shirur News : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. सदावर्तेंच्या प्रतिमेला जोडे मारून धामणीत निषेध..