अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्दच्या पोलीस पाटीलपदी स्नेहल निचीत हिची निवड झाली आहे. निचीत कुटुंबातील सातवी पिढी प्रशासनात कार्यरत होणार आहे. तिच्या निवडीमुळे परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.
निचीत कुटूंबातील सातवी पिढी प्रशासनात
वडनेर खुर्द (ता. शिरूर) या गावच्या पोलीस पाटील पदासाठी निचीत कुटूंबातील सात पिढ्या कार्यरत आहेत. यापूर्वी या परिवारातील रावजी निचीत, तुकाराम निचीत, नाना निचीत, कृष्णा निचीत, दत्तात्रय निचीत, नारायण निचीत आणि आता स्नेहल निचीत या पोलीस पाटील झाल्या आहेत. नुकतीच पोलीस पाटील पदासाठी परीक्षा झाली. (Shirur News) वडनेर खुर्द येथील स्नेहल निचित यांची निवड परीक्षेतून झाली. त्यांना ८० पैकी ७४ गुण मिळाले. त्यांनी बी. ई. कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण घेतले आहे. स्नेहल निचीत यांच्या रूपाने उच्च विद्याविभूषित पोलीस पाटील वडनेर खर्द गावाला लाभला आहे.
निवडीबद्दल बोलताना स्नेहल निचीत म्हणाल्या की, या पदाला न्याय देण्याचे काम करणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविणे व पोलीस बांधवांना योग्य सहकार्य करुन गुन्हेगारी व बेकायदेशीर कामाविरोधात मदत करणार आहे .
या निवडीबद्दल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, भिमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, (Shirur News) पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरुर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाबाजी निचित, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, शिरुर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच दामुअण्णा घोडे, सरपंच नवनाथ निचित व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शिक्षक व पालकांनी शितपेयांबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे : डॉ. संतोष उचाळे
Shirur News : मिडगुलवाडी ड्रग्जप्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल
Shirur News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात