युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : गणेशोत्सव झाला, आता वेध लागले नवरात्रोत्सवाचे! गावागावांत नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिरूर तालुक्यात जगदंबेच्या मंदिराची सजावट व विद्युत रोषणाई सुरू आहे. मूर्तीकार देखील देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. यावर्षी सर्वच सण निर्बंधमुक्त साजरे होत असल्याने, सांस्कृतीक कार्यक्रम घेण्याकडे संयोजकाचा कल वाढला आहे.
सांस्कृतीक कार्यक्रम घेण्याकडे संयोजकाचा कल
नवरात्रोत्सव अगदी आठवड्यावर येऊन ठेपला आहे. रविवारी (ता. १५) घटस्थापना होणार असून, नऊ दिवस चालणारा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्यात कान्हूर मेसाई येथील श्री मेसाईदेवी, कवठे येमाई येथील श्री येमाईदेवी, वडगाव रासाई येथील श्री रासाई देवी, टाकळी हाजी येथील मळगंगा देवी या ठिकाणी विशेष नवरात्र उत्सव साजरा केला जातो.(Shirur News) त्यासाठी होमहवन कार्यक्रम करण्यात येतो. काही ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात येते. दररोज आरती, पूजा-अर्चा, प्रवचन, किर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.instagram.com/reel/CyDMcfxAYak/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
या उत्सवात सार्वजनिक ठिकाणी देवी बसवून गरबा व इतर कार्यक्रम सादर होत असतात. त्यामुळे या भागातील मूर्तीकार देवीच्या आकर्षक मूर्ती बनवतात. कवठे येमाई येथे मूर्तीकार विजय बगाटे यांनी सध्या एक फुटापासून ते सात फुटापर्यंतच्या मूर्ती बनविल्या आहेत. (Shirur News) १ हजार रूपयांपासून ते १५ हजार रूपयांपर्यंत त्याच्या किंमती आहेत. सध्या कच्च्या मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या किंमती वाढल्याचे बगाटे यांनी सांगितले. यावर्षी त्यांनी आकर्षक मूर्ती तयार करून विक्रीस ठेवल्या आहेत.
या उत्सवासाठी हंगामी रोजगार मिळण्यासाठी बेरोजगार तरुण सरसावले आहेत. या दिवसात लागणारे पुजेचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहे. त्यापाठोपाठ गरबासाठी लागणारे साहित्य विक्रीस आले आहेत. जन्माष्टमी, गणेशोत्सव त्यानंतर नवरात्र उत्सवाची तयारी सगळीकडे पहावयास मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मुखई तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी तुषार शुक्रे तर उपाध्यक्ष पदी सुहास मोरे..