योगेश मारणे
Shirur News : न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे आणि उरळगाव या गावांच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मराठा आंदोलक, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
शिरूर तालुक्यात गावोगावी मराठा आंदोलनाचे पडसाद
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नागेश बाजीराव निंबाळकर यांनी आपला राजीनामा न्हावऱ्याच्या मंडलाधिकारी मनीषा खैरे यांच्याकडे दिला. (Shirur News ) तर उरळगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुकाराम रामचंद्र गिरमकर यांनी सरपंच निकिता सात्रस यांच्याकडे राजीनामा दिला.
शिरूर तालुक्यात गावोगावी मराठा आंदोलनाचे पडसाद उमटत असून, प्रशासनाला निवेदने देऊन ठिकठिकाणी आमरण उपोषण, अन्नत्याग तर काही ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे.
दरम्यान, निर्वी (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजातील युवकांनी सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत पुतळ्याचे दहन केले.(Shirur News ) तर वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या उपोषणाची आज (ता. ३१) सकाळी सांगता झाली. त्यानंतर पुन्हा वडगाव रासाई येथे साखळी आंदोलन सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सविंदणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च