साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यपदी शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रूक येथील प्रकाश वायसे यांची निवड झाली आहे. समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शिफारशीने मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी वायसे यांना निवडीचे पत्र दिले.
पाणी वापर संस्थांच्या पदाधिका-यांनी केले अभिनंदन
गेल्या चार वर्षांपासून मीना शाखा कालव्यावरील २८ पाणी वापर संस्थांच्या शिखर अध्यक्षपदी वायसे यांनी काम केले आहे. त्यावेळी एकूण ५० किलोमीटर लांबीच्या कालव्यावरील १७,४१२ हेक्टर लाभ क्षेत्रात रब्बी व खरीप हंगामात पाण्याचे योग्य नियोजन करताना वसुली, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कालव्यातील अडचणी यावर वायसे यांनी काम केले आहे. (Shirur News) कालव्यावरील सर्व पाणी वापर संस्थांचे लेखा परीक्षण, कालव्याची दुरुस्ती, पाणी आवर्तनाचे नियोजन याविषयी उत्कृष्टरित्या काम केल्याने, त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांची निवड केल्याचे मत पाणी चळवळीचे नेते सुभाष झिंजाड यांनी व्यक्त केले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामूशेठ घोडे तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यांनी वायसे यांचे अभिनंदन केले.
शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कटिबद्ध राहीन. तसेच वितरीकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करून त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– प्रकाश वायसे, सदस्य, कुकडी व घोड कालवा सल्लागार समिती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : प्रा. संजय देशमुख यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान