युनूस तांबोळी
( Shirur News ) शिरूर : नियमित कर्जदारांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरले. त्यापैकी काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले पण काही शेतकरी अद्यापही या अनुदानापासून वंचीत आहेत. ३१ मार्च जवळ असल्याने प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रूपये त्वरीत देण्यात यावे. अशी अनुदाना न मिळालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे.
थकीत कर्जदारांना दिलासा म्हणून वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेतून त्यांचे कर्ज माफ करून अशा शेतकऱ्यांना नियमित कर्जवाटप करण्यात येत आहे. हे करीत असताना नियमित कर्जदारांमध्ये आपण नियमीतपणे कर्जे भरतो ही चूक आहे की काय अशी भावन निर्माण होते. त्यामुळेच नियमीत कर्जदारांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून दिलासा म्हणून ५० हजार रूपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे शासनाने ठरविले आहे. काही शेतकऱ्यांना ते अनुदान मिळाले. परंतु अजूनही बरचसे शेतकरी या अनुदानापासून वंचीत आहेत.
यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे सोसायटीचे बरेचशे शेतकरी आहेत. शिरूर तालुक्यातील सोसायटीमधून कमी अधिक प्रमाणात या अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. तर अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही या अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. काही दिवसांवर ३१ मार्च येऊन ठेपला आहे.
सोसायटीच्या कर्जदारांना ३१ मार्चपर्यंत कर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज लागते. त्यामुळे बहुतांश शेतकरी ३१ मार्च पर्यंत कर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस शासनाने वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांचा खात्यात तत्काळ ५ ० हजार रूपये जमा केल्यास शेतकरी कर्ज त्वरीत भरू शकतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी नियमित राहू शकतात.
त्यामुळे शासनाने ही मदत त्वरित जमा करावी. अशी मागणी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अन्यथा थकबाकीदार वाढतील…
३१ मार्चपुर्वी प्रशासनाने पात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार रूपये अनुदान जमा केल्यास शेतकरी थकीत राहणार नाही. विविध कार्यकारी सोसायट्यांची वसुली होईल. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्च पुर्वी ५० हजार रूपये जमा न केल्यास शेतकरी कर्ज भरणार नाहीत. पर्यायाने थकीत कर्जदारांची संख्या वाढेल. त्यातून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची वसुली होणार नाही. थकीत कर्जदारांची संख्या कमी करायची असेल तर शासनाने नियमित कर्जदारांच्या खात्यात ५० हजार रूपयांचे अनुदान जमा करणे गरजेचे आहे.
– संतोष फक्कडराव शिंदे, माजी अध्यक्ष- कान्हूर मेसाई विविध कार्यकारी सोसायटी कान्हूर मेसाई ता. शिरूर
शेतकऱ्यांना कर्जमाफीतून सुट मिळाली. त्या प्रमाणे नियमीत कर्ज भरणाऱ्यांना सुट मिळाली. पण काहीजण आजही वंचीत आहेत. त्यामुळे नियमीत कर्ज भरणाऱ्यांना अनुदान मिळावे. अन्यथा शासनावरचा विश्वास उडेल.
– मारूती तुकाराम डफळ शेतकरी, धामारी ता. शिरूर