अमोल दरेकर
Shirur News : सणसवाडी : जालना येथील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सणसवाडी (ता. शिरूर) याठिकाणी साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
युवक, कामगार, महिला सहभागी
या वेळी भजनी मंडळाच्या वतीने भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात युवक, कामगार, महिलांनी सहभागी होत सणसवाडी चौकात साखळी उपोषणास केले. (Shirur News ) याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्याकडून पोलीस बंदोस्त करण्यात आला होता.
या वेळी राज्यातील परिस्थिती पाहता आपण सर्वांनी संयम राखत सहकार्य करण्याचे आणि सार्वजनिक परिसरात कोणताही अनुचित प्रकार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. (Shirur News ) चुकीचे घडत असेल तर पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले.
या वेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष वैभव यादव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी पंचायत समिती सदस्या सविता दरेकर, सरपंच सुवर्णा दरेकर,?(Shirur News ) नवनाथ हरगुडे, बाबा दरेकर, विकास हरगुडे, नाना दरेकर, विद्याधर दरेकर यांनी अन्नत्याग उपोषण केले. ग्रामस्थांनी यासाठी पाठींबा दर्शवला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : करंदी येथे सकल मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण
Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस