शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत : जालना येथील अंतरवाली सराटी येथे गेले सहा दिवसांपासून उपोणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य कॅन्डल मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
हजारोंची उपस्थिती
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्केट यार्ड येथील पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी सरकारला कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेण्यासाठी आवश्यक ती वेळ मनोज जरांगे पाटील यांनी द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांनी आज विनंती केली आहे. महाराष्ट्रात मराठा समाज हा खूप मोठा अआहे. (Shirur News) या समाजाला आज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने समाज रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करत आहे. आरक्षणप्रश्नी सरकारी पातळीवर उदासीनता दिसत असल्याची समाजाची भावना आहे.
मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसत होती. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत, मोर्चा मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार कचेरीकडे जात असताना हजारो नागरिक यात सहभागी झाले. शिरूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने प्राध्यापक सतीश धुमाळ यांनी समाजाला आरक्षणाची किती गरज आहे, याविषयी मार्गदर्शन केले. मराठा समाज हा शांतता प्रिय आहे. सरकारने समाजाचा संयम पाहू नये. (Shirur News) तत्काळ आरक्षण द्यावे, ही मागणी केली.
दरम्यान, चिंचणी (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चौधरी गेले सहा दिवसांपासून शिरूर तहसील कार्यालयात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. (Shirur News) त्यांना शिरूर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सकल मराठा आरक्षणासाठी सणसवाडीत साखळी उपोषण
Shirur News : करंदी येथे सकल मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण
Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस