Shirur News : कोरेगाव भीमा : शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने एका शेतकऱ्यावर झडप मारल्याची धक्कादायक घटना कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आनंद किसन फडतरे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा परिसरात नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. शुक्रवारी सायंकाळी शेतात पिकांना पाणी देत असताना बिबट्याने व शेतकरी आनंद फडतरे यांच्यात झटापट झाली. यावेळी आनंद फडतरे यांनी आरडाओरडा केली तेव्हा बिबट्या शेतात पळून गेला. (Shirur News) या हल्ल्यात फडतरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी बबन दहातोंडे, चालक अभिजित सातपुते, शिरुर वनविभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. (Shirur News) आणि परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांनी सांगितले.
दरम्यान, डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सविंदणेत खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
Shirur News : कासारी येथे नवरात्री निमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’