धनंजय साळवे
Shirur News : कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरुर) येथील फ्रेंडशिप गणेश मित्र मंडळ व पुणे ब्लड सेंटर हडपसर, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश उत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच सुनीता पोकळे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपसरपंच उत्तम जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, माजी सरपंच दीपक रत्नपारखी, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य मिट्टू शेठ बाफना, डॉ. विकास शेटे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर रोकडे, फ्रेंडशिप गणेशोत्सव अध्यक्ष तेजस काळे, ऋषिकेश जाधव, (Shirur News) सामाजिक कार्यकर्ते नितीन मुखेकर, सनी रेनके, बाबाजी वागदरे, अविनाश पोकळे, बाळशीराम मुंजाळ, अमोल ढोरके, मयूर रेणके, अक्षय भंडारी उपस्थित होते.
हडपसर ब्लड बँकेने केले रक्तसंकलन
फ्रेंडशिप गणेश मित्र मंडळाचा रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य असून, इतर मंडळांनीही त्यांचा आदर्श घेऊन विधायक कामासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन कवठे येथील सरपंच सुनीता पोकळे यांनी केले. हडपसर ब्लड बँकेचे डॉ. जयेश गावडे, डॉ. संदीप शर्मा, डॉ. दत्ता, डॉ. सौरभ गायकवाड, डॉ. ऋतुजा बर्वे, डॉ. छाया औटी यांनी रक्तदानाचे सर्व कामकाज पाहिले. या वेळी संस्थेकडून प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले. (Shirur News) या प्रमाणपत्राचा उपयोग करून ब्लड बँकेतून जवळच्या व्यक्तींना वा गरजूंना रक्त उपलब्ध करून देणे सोपे होणार आहे.
रक्तदान केल्याने हृदयरोगाचा व कर्करोगाचा धोका कमी होतो, वजन कमी होण्यास, नवीन रक्तपेशींचे उत्पादन होण्यास व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (Shirur News) मानसिक आरोग्यासाठीही रक्तदानाचा फायदा होतो, अनेकांना रक्तदानामुळे जीवनदान मिळते, अशी माहिती पुणे ब्लड बँकेतर्फे देण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : बंदूकधारी पोलीस, रुग्णवाहिका अन् जमावाला थोपविण्याची धडपड
Shirur News : कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं…! शेत शिवारावर बाजरीचे पिक डोलू लागले