Shikrapur Crime | शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) (Shikrapur Crime) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीनमधून अज्ञात चोरट्याने ९० हजारांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी अनिल किसन आदक (वय ४१ रा. लोणी धामणी ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता.१३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंपाच्यासमोर शरद बँक आहे. आणि बँकेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. नेहमीप्रमाणे बँकेचे व्यवस्थापक यांनी सोमवारी (ता.१३ मार्च) मशीनमधील रकमेची तपासणी करून नोंद केली. आणि ते घरी गेले.
दरम्यान, व्यवस्थापक यांनी दुसऱ्या दिवशी मशीनमधील रकमेचा तपशील तपासाला असता, त्यांना ९० हजार रुपये कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता, एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एटीएममध्ये प्रवेश करुन कशाच्यातरी सहाय्याने मशीनची छेडछाड केली आणि मशीनमधील तब्बल ९० हजार रुपये चोरुन नेले आहेत.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Breaking News | मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू..!