संदीप टूले
केडगाव, ता.३० : केडगाव (ता. दौंड) येथील नागेश्वर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत मुरलीधर शेळके यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गणपत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवडीची परंपरा या सोसायटीने कायम राखली आहे.
दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. संपत शेळके यांनी नुकताच माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. या सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत शेळके यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मार्केट कमिटीचे सदस्य सचिन लालासाहेब शेळके, धनंजय शेळके विशाल शेळके, विलास शेळके ,गोरख शेळके , दत्ता शेळके, विकास शेळके ,अतुल शेळके , कुमार शेळके तुका शेळके यांसह सोसायटीचे आजी-माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार विलास शेळके यांनी मानले.