Sad News : पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज (ता. २४ ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या. मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
वयाच्या ८०व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!
दरम्यान, सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव याने २०२० मध्ये सोशल मीडियावर त्यांच्या आजारपणाबाबत माहिती दिली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सीमा देव यांचे पती रमेश देव यांचे निधन झाले होते. (Sad News) आता सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ या १९६१ मध्ये झळकलेल्या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर सुवासिनी, आनंद अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
रमेश देव आणि सीमा देव यांनी केवळ अभिनयानेच नव्हे तर आपल्या प्रेमकहाणीने देखील चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं होतं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. (Sad News) त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
सीमा देव अभिनीत चित्रपट
अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात सीमा देव यांनी श्रीमती सुमन कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी कोशिश आणि सरस्वतीचंद्र यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यंदा कर्तव्य आहे, माझी आई, सुवासिनी, सोनियाची पावले, मोलकरीण यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. (Sad News) सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, पाहू रे किती वाट, अपराध, या सुखांनो या या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा देव यांना मिळाला होता.
चरित्र अभिनेत्री सीमा देव
चरित्र अभिनेत्री म्हणून सीमा यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील गाजवले. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांसह त्यांना बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मीनाकुमारी, अनिल कपूर, गोविंदा, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांसारख्या सर्व पिढीतील कलावंतांसह काम करताना आपल्या भूमिकेशी त्या प्रामाणिक राहिल्या. भाभी की चूडियाँ, आँचल, आनंद, प्रेमपत्र, मियाँ बीबी राजी, तकदीर, हथकडी, मर्द हे सीमा यांचे हिंदी चित्रपट प्रचंड गाजले होते. (Sad News) नंदिनी, काळी बायको, या सुखांनो या, जानकी, पोरींची धमाल बापाची कमाल, सर्जा, जिवा सखा, कुंकू या चित्रपटात देखील त्यांनी चांगल्या भूमिका साकारल्या.
कलाविश्वावर शोककळा
१९६१ मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रमेश देव आणि सीमा देव दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुले आहेत. अजिंक्यने आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.
अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा देव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेऊन स्वत:ला संसारात गुंतवून घेतले होते. पुढे आई म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असताना, आयुष्याच्या एका टप्प्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटांमधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली. ‘सर्जा’ या त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देवच्या आईची भूमिका साकारली होती.
अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, माझ्या पहिल्या चित्रपटात त्यांनी पडद्यावर माझ्या आईची भूमिका साकारली होती. (Sad News) त्यामुळे स्क्रीनवर मला भेटलेल्या त्या पहिल्या आई आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sad News : मनोरंजन विश्वावर शोककळा; चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन