यवत(पुणे): पुणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले असून दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दौंड तहसील कार्यालय येथे पार पडली.
दौंड तालुक्यातील सन 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या 80 ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज बुध दि. 23 रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडली. यात अनुसूचित जातीसाठी-11 अनुसूचित जमातीसाठी- 2, नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी – 21 व सर्वसाधारण जागेसाठी- 29 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान यातील 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक कामाला लागले. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काहीजणांच्या आशेवर पाणी फिरले गेल्याचे दिसून आले.
काही ठिकाणी महिला आरक्षण आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला .
वरवंड, पाटस, सहजपुर, खुटबाव , कासुर्डी, गोपाळवाडी आदी नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणाऱ्या गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटाला तर यवत, बोरीपार्धी, खामगाव, भांडगाव या गावांमध्ये महिलांना संधी मिळणार आहे. भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या राहू गावाच्या सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेला तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण गटाला मिळाले आहे.
गावनिहाय पडलेले आरक्षण खालील प्रमाणे
अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती- जिरेगाव, बोरीऐंदी, वडगांवबांडे,
मलठण, कौठडी,पारगांव.
अनुसूचित जाती सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती- वाटलुज, पाटेठाण,भरतगाव, लडकतवाडी, देवकरवाडी.
(नागरीकाचा मागास प्रवर्ग स्त्री) निश्चित केलेल्या ग्रामपंचायती- रोटी, राहु , नायगाव,खोरवडी, कुरकुंभ, राजेगाव, डाळींब,कोरेगाव भिवर, मिरवडी, गलांडवाडी, दापोडी.
नागरीकाचा मागास प्रवर्ग ग्रामपंचायती- एकेरीवाडी, टेळेवाडी, नंदादेवी, खोर, दहिटणे, केडगाव, पडवी, खडकी, पिंपळगाव, चिंचोली.
अनुसूचित जमाती- कुसेगाव,
अनुसूचित जमाती स्त्री- हिंगणीगाडा
सर्वसाधारण स्त्री- वासुंदे, कानगाव, पांढरेवाडी, हिंगणीबेर्डी, कडेठाण, नानविज, खामगाव, पेडगाव, बोरिबेल, भांडगाव, देऊळगावगाडा, हातवळण, लिंगाळी, टाकळी, सोनवडी, वाळकी, यवत, उंडवडी, गिरीम, आलेगाव, वाखारी, बोरीपार्धी, नांदूर.
सर्वसाधारण- देलवडी, नाथाचीवाडी, देऊळगावराजे, पिलानवाडी, वडगाव दरेकर, बिरोबावाडी, बोरीभडक, गोपाळवाडी, लोणारवाडी, खुटबाव, मळद, शिरापूर, नानगाव, गार, खोपोडी, पाटस, रावणगाव, सहजपुर, ताम्हणवाडी, वरवंड, कासुर्डी, खानवटे, पानवली.