Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर कुंजीरवाडीसह मोठ्या गावांचा कारभार पुढील पाच वर्षांसाठी महिलांच्या हाती ; उरुळी कांचनचे सरपंच पद पुन्हा एकदा खुले

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 23 April 2025, 21:11

लोणी काळभोर, (पुणे) : गावगाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत बुुधवारी काढण्यात आली. यामुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. हवेली तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. उर्वरित 5 ग्रामपंचायतींचे आरक्षण अगोदर काढण्यात आले होते.

हवेली तालुक्याचे तहसीलदार किरण सुरवसे, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या उपस्थितीत पुढील  2025 ते  2030 या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक आजपासूनच कामाला लागले आहेत. विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर काहीजणांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसून आले.

हवेली तालुक्यातील 71 ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीतून ठरले. यात लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी आदी नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत राहणाऱ्या गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटातील महिलेला लाभले. तर उरुळी कांचन गावाच्या सरपंचपदाचे आरक्षण खुल्या गटातील पुरुषाला मिळाले आहे.

यावेळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतीत तोंडी आक्षेप तहसीलदारांकडे नोंदवले. तहसीलदारांनी सर्वांचे सविस्तर आक्षेप ऐकून घेतले. यावेळी ते म्हणाले निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन व निर्देशानुसार हि आरक्षण सोडत होत आहे. या सोडती बाबतीत कुणालाही काही आक्षेप असतील तर त्यांनी माझ्याकडे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी नोंदवावे. प्रत्येक आक्षेपाचे कायदेशीर निराकरण करण्यात येईल.

आरक्षण सोडतीनंतर निश्चित झालेले सरपंच पदाचे आरक्षण

सर्वसाधारण –
वडगांव शिंदे, फुलगाव, बहुली, अहिरे, मालखेड, खानापुर, डोणजे, गोऱ्हे खुर्द, सोनापुर, बकोरी, बिवरी, शिरसवडी, तुळापुर, पिंपरी सांडस, पेरणे, वाडेबोल्हाई, लोणीकंद, अष्टापुर, न्हावी-सांडस, उरुळीकांचन

सर्वसाधारण महिला –
कल्याण, मांजरी खुर्द, खडकवाडी, मांडवी बुद्रुक, आर्वी, गाऊडदरा, खेड शिवापूर, श्रीरामनगर, घेरासिंहगड, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी साष्टे, भवरापुर, हिंगणगांव, सांगवी सांडस व नायगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग-
निरगुडी, मांडवी खुर्द, कुडजे, गोगलवाडी, कोंंढणपुर, डोंगरगाव, खामगाव टेक, सोरतापवाडी, गोऱ्हे बुद्रुक.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला –
वडकी, जांभळी, आंबी, पेठ, प्रयागधाम, सागरुण, मणेरवाडी, शिवापूर, वढु खुर्द, कोरेगाव मुळ.

अनुसूचित जाती –
खामगाव मावळ, भावडी, बुर्केगाव, शिंदवणे, तरडे

अनुसूचित जाती महिला
आगळंंबे, वळती, रहाटवडे, केसनंद, टिळेकरवाडी.

अनुसूचित जमाती – शिंदेवाडी

अनुसूचित जमाती महिला – वरदाडे

दरम्यान, थेट जनतेतून सरपंच पदाची निवड असल्याने हवेली तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीची उपस्थिती फारच कमी होती. अंदाजे दोनशे नागरिक यावेळी उपस्थित होते. जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने निवडणूक लढवायला खुपच खर्च येतो. त्यामुळे इच्छुक आपोआपच कमी होतात अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये सुरु होती. आपल्या गावातील आरक्षण समजल्यानंतर नागरिक लगेच तेथून बाहेर पडत होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

दौंड तालुक्यातील 80 गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; कही खुशी, कही गम !

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.