शिरूर,ता.23: शिरूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज (ता.23) जाहीर करण्यात आले. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर अनेकांना आजच ‘सरपंच’ झाल्यासारखे वाटू लागल्याचे अनेकांच्या चेहऱ्यावर हावभाव होते.
शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात प्रांताधिकारी पुनम अहिरे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील 96 गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मोठ्या उत्साहात पार पडली.
पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत हा स्थानिक पातळीवरील प्रशासनाचा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांनी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी (29) सर्वसाधारण प्रवर्गासाठी (30) ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (13) ओबीसी महिला (13) अनुसुचित जाती सर्वसाधारण (4) अनुसूचित जाती महिला (4)अनुसुचित जमाती सर्वसाधारण (1) अनुसुचित जमाती महिला (2) असे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग सरपंच: शिरूर ग्रामीण, टाकळी हाजी, रांजणगाव गणपती, मांडवगण फराटा, सणसवाडी, मलठण, इनामगाव, ढोक सांगवी, चिंचणी, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, तळेगाव ढमढेरे, सोने सांगवी, दहिवडी, बाभूळसर खुर्द, सविंदणे, सरदवाडी, जातेगाव बुद्रुक, धामारी, जातेगाव खुर्द, करंजावणे, पिंपरी खालसा
सर्वसाधारण महिला राखीव सरपंच : न्हावरे, आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, टाकळी भीमा, आपटी, केंदूर, कोरेगाव भीमा, चिंचोली मोराची, शिंदोडी, उरळगाव, गणेगाव दुमाला, पाबळ, भांबर्डे, बुरुंजवाडी, खैरेनगर, विठ्ठलवाडी, आलेगाव पागा, शिक्रापूर, मोटेवाडी, डिंग्रजवाडी, कोंढापुरी, पिंपरखेड, वरुडे, निमगाव दुडे, निर्वी, बाभूळसर बुद्रुक, दरेकरवाडी, तर्डोबाचीवाडी, गुनाट.
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग राखीव सरपंच: मुखई, गोलेगाव, वढु बुद्रुक, जांबूत
अनुसूचित जाती सर्वसाधारण सरपंच: आमदाबाद, वाजेवाडी, निमगाव म्हाळुंगी, हिवरे
अनुसूचित जमाती महिला राखीव सरपंच: वडगाव रासाई, माळवाडी
अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव सरपंच: कुरुळी
ओबीसी महिला राखीव सरपंच: निमगाव भोगी, रावडेवाडी, निमोणे, नगरगाव, पिंपळसुटी, पिंपळे जगताप, पिंपरी दुमाला, सादलगाव, म्हसे बुद्रुक, शरदवाडी, वाडा पुनर्वसन, चव्हाणवाडी, कर्डे
ओबीसी सर्वसाधारण सरपंच: वाघाळे, अण्णापूर, खैरेवाडी, पारोडी, खंडाळे, फाकटे, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी, कवठे येमाई, आंधळगाव, गणेगाव खालसा, कासारी, कान्हूर मेसाई, कारेगाव