RBI पुणे : भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) (RBI नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुवर्णयुग सहकारी बँक प्रा. लि. ला १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. याप्रकरणी २७ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या नोटीसीनुसार ही कारवाई केली आहे.
नियमांचे पालन सुवर्णयुग बँकेला करता आले नाही…!
आरबीआयने (RBI) ठरवून दिलेल्या नियमांचे पालन सुवर्णयुग बँकेला करता आले नाही. त्यामुळे आरबीआयने बँकिंग नियमन कायद्यानुसार ही कारवाई केली आहे.
सुवर्णयुग बँकेत असणारी ठेवीदारांची रक्कम किमान रकमेपेक्षाही कमी होती. किमान रकमेपेक्षा ठेवीदारांची रक्कम कमी असल्यास संबंधित बँकेला दंड ठोठावला जातो.
सुवर्णयुग बँकेचा याबाबतचा अहवाल आरबीआयने ३१ मार्च २०२१ रोजीच मागवला होता.या अहवालात सुवर्णयुग बँकेतील किमान रक्कम कमी असल्याचे समोर आले होते. त्यानुसार बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.