शेरखान शेख
Ranjangaon News : रांजणगाव गणपती : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान म्हणून भारत सरकारने १९६६ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्याच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन करतो, असे उद्गार लाल बहादूर शास्त्रींचा वेष परिधान केलेले प्रेम अनिल जगताप यांनी काढले.
प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सभेचे आयोजन
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानी असणारे विद्यार्थी प्रेम जगताप यांनी मनोगत व्यक्त करत लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केले. (Ranjangaon News) सभेत पहिली ते सातवीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. मात्र, प्रेम जगताप या विद्यार्थ्याने चक्क लाल बहादूर शास्त्रींचा वेष परिधान करत लाल बहादूर शास्त्रींच्या कार्यकतृत्वाविषयी माहिती दिली.
शिक्षकांनी देखील अचंबित होत, प्रेम जगताप याला शाळेतील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिले. प्रथमच शाळेतील विद्यार्थ्याला अध्यक्षस्थानी विराजमान होण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. (Ranjangaon News) या वेळी मुख्याध्यापिका शशिकला सोनवणे, आदर्श शिक्षक अशोक बगाटे, अनिल व्यवहारे, शरद शेळके यांसह शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रेम अनिल जगताप याने लालबहादूर शास्त्रीजी यांचे देश कामासाठी झालेले योगदान तसेच त्यांच्या पंतप्रधान कालखंडातील कामाबाबत उपस्थितांना माहिती दिली. (Ranjangaon News) या वेळी शिक्षक अनिल व्यवहारे यांनी सर्वांचे आभार मानले. लाल बहादूर शास्त्रींबाबत माहिती दिल्याने प्रेम जगताप याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : कारेगावात महिलेचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल